अ‍ॅपशहर

वसतिगृहातील समस्यांनी संतापले विद्यार्थी

गोदावरी मेडिकल कॉलेज जवळ असलेल्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसून, अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप करत वसतिगृह प्रशासनाच्या भोंगळ काराभाराविरोधात विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

Maharashtra Times 23 Aug 2016, 10:39 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम adivasi andolan
वसतिगृहातील समस्यांनी संतापले विद्यार्थी

गोदावरी मेडिकल कॉलेज जवळ असलेल्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसून, अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप करत वसतिगृह प्रशासनाच्या भोंगळ काराभाराविरोधात विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

आंदोलनप्रसंगी वसतिगृह प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना निवेदन दिले. अख्तर तडवी, योगेश गावित, दत्तू डोळे, तुकाराम पवार, सनिल तडवी आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले होते की, मुलांना सूड भावनेतून त्रास दिला जात आहे. शासनाच्या जीआरनुसार वसतिगृहात कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. मेसमध्ये मिळत असलेले जेवण निकृष्ट दर्जाचे आहे. वसतिगृहात नियमित साफसफाईदेखील केली जात नाही. त्यामुळे तेथे राहणे कठीण झाले आहे. जागोजागी अस्वच्छता असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसतिगृह प्रवेशासाठी असलेली वेबसाइट कायम हँग असते. यासंदर्भात प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी.

समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी वर्षभरात दोन वेळा आंदोलन केली आहेत. परंतु प्रत्येक वेळी प्रशासनाकडून केवळ आश्वासने देण्यात येतात. गृहपाल प्रवीण रोकडे हेदेखील या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. गेल्या आठवड्यात प्रकल्प अधिकारी प्रदीप पोळ यांनी वसतिगृहाची पाहणी केली, परंतु केवळ पोकळ आश्वासन दिले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. समस्यांवर उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज