अ‍ॅपशहर

मोर्चाने दणाणले शहर

आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी व इतर आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सरकारने आदिवासी समाजाला दिलेले आश्वासनांची पूर्तता न केल्याने आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे चोपडा ते जळगाव संघर्ष पदयात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला.

Maharashtra Times 13 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम adiwasi peoples hiking chopda to jalgaon for demands
मोर्चाने दणाणले शहर


आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी व इतर आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सरकारने आदिवासी समाजाला दिलेले आश्वासनांची पूर्तता न केल्याने आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे चोपडा ते जळगाव संघर्ष पदयात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या या मोर्चात आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे शहर दणाणले होते.

वैधताप्रमाणत्राअभावी समाज सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून वंचित असल्याची व्यथा समाजातर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडण्यात आली. आदिवासी वाल्मिकलव्य महासंघ संचलित आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली समाजाच्या प्रलंबित मागण्यासंबंधी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चोपडा ते जळगाव ६० किलोमीटर पायी संघर्षयात्रा काढण्यात आली.

सोमवारी (दि. ११) सकाळी चोपडा येथून संघर्ष यात्रेला सुरवात झाली. मंगळवारी (दि. १२) संघर्षयात्रा दुपारी १ वाजता शहरातील वाल्मिक नगरात आली. याठिकाणी आद्यकवी महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन करून संघर्ष पदयात्रा शनीपेठ, टॉवर चौक, नेहरू चौक, स्टेडियम चौक, स्वातंत्र्यचौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली.

आदिवासींच्या या पदयात्रेत मोहन शंकपाळ, डी. पी. सांळुखे, नगरसेवक कैलास सोनवणे, विदगावचे प्रशांत पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेवून प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शिष्टमंडळाशी मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करून जिल्हा पातळीवरील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज