अ‍ॅपशहर

‘शिवजयंती उत्सवात सर्वांनी सामील व्हावे’

शिवाजी महाराज कुणा एका जातीचे, कुठल्या एका पंथाचे नव्हते किंवा कुठल्या धर्माचे विरोधकही नव्हते. त्यांनी जाती-धर्माला थारा न देता स्वराज्याची स्थापना केली होती. १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती महोत्सवात महाविद्यालयीन युवक-युवतींनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष शंभू पाटील यांनी केले.

Maharashtra Times 14 Feb 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम all of you take part in shivjayanti program
‘शिवजयंती उत्सवात सर्वांनी सामील व्हावे’

शिवाजी महाराज कुणा एका जातीचे, कुठल्या एका पंथाचे नव्हते किंवा कुठल्या धर्माचे विरोधकही नव्हते. त्यांनी जाती-धर्माला थारा न देता स्वराज्याची स्थापना केली होती. १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती महोत्सवात महाविद्यालयीन युवक-युवतींनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष शंभू पाटील यांनी केले.

नूतन मराठा कॉलेजमध्ये सोमवारी (दि. १३) झालेल्या शिवजागर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अॅड. विजय पाटील, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य प्रा. डी. पी. पवार, प्रा. संजय सुर्वे, खुशाल पाटील उपस्थित होते. गणपती उत्सव आपण आपला धार्मिक सण मानतो त्याप्रमाणेच शिवजयंतीकडेदेखील राष्ट्रीय सण म्हणून बघायला हवे, असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून जगण्याला दिशा मिळते. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता संकटाशी दोन हात करण्याची उभारी मिळते. एवढेच नव्हे तर ‘शून्यातून विश्व निर्माण करता येते’ , खंबीरपणे उभे राहाता येते, आयुष्यातील संकटे, पराभव, मानहानी, अपमान या सर्वांवर शिवचरित्राच्या माध्यमातून निश्चितपणे विजय मिळविता येतो, हा माझा अनुभव असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला कॉलेजातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले.

आज बुद्धिबळ स्पर्धा

आज (दि. १४) कांताई सभागृहात सकाळी १० वाजता बुद्धिबळ स्पर्धा तसेच इकरा कॉलेज, मेहरूण येथे संध्या ७ वाजता मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज