अमळनेर : अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी हे सोमवारी सायंकाळी कार अपघातातून बालंबाल बचावले. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आमदार शिरीष चौधरी यांच्या कार (एमएच ३९ एए ८३८३) ला नंदुरबारपासून सात किलोमीटरच्या अलिकडे वावदा गावाजवळ अपघात झाला. ते अमळनेरहून नंदुरबारला जात होते. एका ट्रकला ओव्हरटेक करीत असताना ही घटना घडली. यात आमदार चौधरी यांना पायाला जखम झाली असून, हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक सुरेंद्र पाटील यांना डोक्याला लागले असून, कारचे चालक संभाजी पाटील यांच्या पायाला लागले आहे. संबंधितांवर नंदुरबारच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आमदार शिरीष चौधरी कार अपघातात बचावले
अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी हे सोमवारी सायंकाळी कार अपघातातून बालंबाल बचावले. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आमदार शिरीष चौधरी यांच्या कार (एमएच ३९ एए ८३८३) ला नंदुरबारपासून सात किलोमीटरच्या अलिकडे वावदा गावाजवळ अपघात झाला. ते अमळनेरहून नंदुरबारला जात होते.
Maharashtra Times 18 Sep 2018, 5:00 am