अ‍ॅपशहर

साने गुरुजी वाचनालयाच्या निवडणुकीत विकास पॅनलचे वर्चस्व

साने गुरुजी सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाच्या द्विवार्षिक निवडणुकीतील अत्यंत चुरशीच्या लढतीत विकास पॅनलचे १२ पैकी ११ उमेदवार विजयी झाले. यामुळे प्रस्थापित माऊली पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. अध्यक्षपदी विकास पॅनलचे दिलीप सोनवणे तर चिटणीसपदी प्रकाश वाघ, उपाध्यक्षपदी माधुरी भांडारकर, विश्वस्तपदी चंद्रकांत नगांवकर, संयुक्त चिटणीसपदी सुमीत धाडकर विजयी झाले.

Maharashtra Times 23 Jul 2018, 5:00 am
म. टा. वृत्तसेवा, अमळनेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amalner saneguruji vachnalay election result out vikas panel wins
साने गुरुजी वाचनालयाच्या निवडणुकीत विकास पॅनलचे वर्चस्व

साने गुरुजी सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाच्या द्विवार्षिक निवडणुकीतील अत्यंत चुरशीच्या लढतीत विकास पॅनलचे १२ पैकी ११ उमेदवार विजयी झाले. यामुळे प्रस्थापित माऊली पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. अध्यक्षपदी विकास पॅनलचे दिलीप सोनवणे तर चिटणीसपदी प्रकाश वाघ, उपाध्यक्षपदी माधुरी भांडारकर, विश्वस्तपदी चंद्रकांत नगांवकर, संयुक्त चिटणीसपदी सुमीत धाडकर विजयी झाले.

सानेगुरुजी सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलतर्फे सभासदांपर्यंत दावे प्रतिदावेचे पत्रक घरोघरी पोहचविण्यात आले होते. निवडणूक जुन्या की नव्या घटनेनुसार घ्यावी, सर्व सभासदांचे मतदानाचे हक्क कायम राहावे म्हणून वर्षभरापासून आजीव सभासदांच्या वतीने रणजित शिंदे, भाऊ घासकडवी यांनी घटनेच्या संदर्भातील निर्णयासाठी अपील करून वातावरण तापवलेले होते. या पार्श्वभूमीवर निरीक्षक गजानन औटे यांच्या देखरेखीखाली ही पूर्ण निवडणूक पार पडली. अध्यक्ष आत्माराम चौधरी यांचे माऊली पॅनलसमोर श्यामकांत भदाणे व सहकारी यांच्या विकास पॅनलचे आव्हान होते. या लढतीत विकास पॅनलने बाजी मारली. या निवडणुकीत पात्र २४९ सभासदांपैकी २१५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. कार्यकारी सदस्य पदासाठी विकास पॅनलचे भिमराव साहेबराव जाधव, ईश्वर रामदास महाजन, नीलेश अशोक पाटील, अॅड. रामकृष्ण अमृत उपासनी, दीपक उखर्डू वाल्हे, पी. एन. भादलीकर हे विजयी झाले. माऊली पॅनलचे एकमेव उमेदवार प्रसाद प्रभाकर जोशी हे विजयी झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज