अ‍ॅपशहर

अनुभूती शाळेचे जपानमध्ये यश

जगातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आणि बदलत्या विविध प्रवाहांवर विचारमंथन करण्यासाठी जपान येथे ‘एशियन अ‍ॅण्ड ओशिनीयन हायस्कूल फोरम’तर्फे आशियातील प्रमुख देशातील २० शाळांना आमंत्रित करण्यात आले होते.

Maharashtra Times 15 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anubhuti school jalgaon success in japan
अनुभूती शाळेचे जपानमध्ये यश


जगातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आणि बदलत्या विविध प्रवाहांवर विचारमंथन करण्यासाठी जपान येथे ‘एशियन अ‍ॅण्ड ओशिनीयन हायस्कूल फोरम’तर्फे आशियातील प्रमुख देशातील २० शाळांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात भारताचे प्रतिनिधीत्व जळगावमधील अनुभूती इंटरनॅशनल निवासी शाळेने केले. या चर्चासत्रात ‘सागरी प्रदूषण आणि जागतिक परिणाम’ विषयावर अनुभूती शाळेने सादरीकरण केले.

या चर्चासत्रात आशियातील एकूण २० देशातील प्रत्येकी एका शाळेला आमंत्रित करण्यात येते. या परिषदेत एका विद्यार्थ्याला व शिक्षकाला सहभागी होता येते. भारतातून जळगावच्या अनुभूती इंटरनॅशनल निवासी शाळेतील इ. ११ वी सायन्सचा विद्यार्थी सार्थक मेश्राम व शिक्षिका स्नेहल जोशी यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. ‘आंतरराष्ट्रीय समस्या आणि जागतिकरण’ या विषयांतर्गत अनुभूती इंटरनॅशनल शाळेतर्फे ‘सागरी प्रदूषण आणि जागतिक परिणाम’ यावर सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे सलग चौथ्यांदा अनुभूती शाळेची निवड झाल्याबद्दल संचालिका निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव यांनी सहभागींचे कौतुक केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज