अ‍ॅपशहर

आशा, अंगणवाडी सेविका देवदूतच!

'बेटी बचाओ बेटी पढाओ' या देशव्यापी अभियानाबाबत समाजात जनजागृती करून मुले-मुलींमधील लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढविण्यासाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर या सर्व समाजासाठी देवदूत असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी काढले.

Maharashtra Times 15 Oct 2017, 4:00 am
जिल्हाधिकारी राजेनिंबाळकरांचे गौरवोद्गार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम asha workers and anganwadi workers are angel
आशा, अंगणवाडी सेविका देवदूतच!


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

'बेटी बचाओ बेटी पढाओ' या देशव्यापी अभियानाबाबत समाजात जनजागृती करून मुले-मुलींमधील लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढविण्यासाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर या सर्व समाजासाठी देवदूत असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी काढले.

बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेंतर्गत बालिका सप्ताहाचा समारोप शनिवारी (दि. १४) येथील नियोजन भवनात जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तडवी, तहसीलदार अमोल निकम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, सरस्वती बागूल उपस्थित होते.

देशात मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता २०१५ मध्ये लिंग गुणोत्तरात जळगावचा दुसरा क्रमांक होता, अशी माहिती निंबाळकर यांनी दिली. त्यावेळी जिल्ह्यात १ हजार मुलांच्या तुलनेत ८४२ मुली जन्माला येत होत्या. परंतु, जिल्ह्यातील आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांनी या योजनेच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे जनजागृती केल्याने आता हे प्रमाण ८४१ वरून ९०३ इतके वाढल्याचे सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज