अ‍ॅपशहर

शिक्षण सचिवांसह अधिकाऱ्यांना नोटीस

जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था निवडणूकीनंतर पाटील गटाच्या ताब्यात आहे. संस्थेचा ताबा मिळविण्यासाठी षडयंत्र रचून ताबा घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. यावर नरेंद्र पाटील यांनी खंडपीठात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सहसंचालक केशव तुपे, शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी यांना नोटीस बजाविली असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांचे वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Maharashtra Times 13 Mar 2018, 4:00 am
जजिमविप्र संस्थेचा ताब्यासाठी बनावट कागदपत्रांचा ठपका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad sessional court notice to jalgaon jilha maratha vidya prasarak mandal officials including education secretaries
शिक्षण सचिवांसह अधिकाऱ्यांना नोटीस


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था निवडणूकीनंतर पाटील गटाच्या ताब्यात आहे. संस्थेचा ताबा मिळविण्यासाठी षडयंत्र रचून ताबा घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. यावर नरेंद्र पाटील यांनी खंडपीठात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सहसंचालक केशव तुपे, शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी यांना नोटीस बजाविली असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांचे वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जजिमविप्र संस्थेची निवडणूक होऊन नरेंद्र पाटील यांचे संचालक मंडळ १५ मे २०१५ रोजी निवडून आले. नंतर निवडणूक आयोगाने नोटीफिकेशन काढले. त्यानंतर प्रशासकाने नरेंद्र पाटील गटाकडे संस्थेचा ताबा दिला. हा ताबा दिल्यानंतर संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार नरेंद्र पाटील पाहत आहेत. त्यानुसार उच्च न्यायालयात त्यानुसार डॉ. माने यांनी खंडपीठात शपथपत्र लिहून संस्थेचे कामकाज नरेंद्र पाटील पाहत असल्याचे सांगितले. मविप्र संस्थेचा ताबा नरेंद्र पाटील गटाकडे कायम ठेवण्याचे आदेश असताना, शिक्षण संचालक डॉ. माने, सहसंचालक केशव तुपे यांच्यासह नूतन मराठा कॉलेजचे प्राचार्य एल. पी. देशमुख, यावल येथील प्राचार्य एफ. एम. महाजन, वरणगावचे प्राचार्य पी. बी. देशमुख यांनी षडयंत्र रचून ताबा घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. सरकारने सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे मंजूर व मान्य असलेल्या संचालक मंडळाकडे ताब्याचे आदेश असताना खोटे व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी नरेंद्र पाटील यांनी अवमान याचिका दाखल केली होती. यावर खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे व न्या. गव्हाणे यांच्याकडे सुनावणी होऊन युक्तिवादानंतर शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सहसंचालक केशव तुपे, शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी प्र. ह. कदम यांना नोटीस काढली आहे.

पोलिसांनाही खंडपीठाचा झटका

मराठा विद्याप्रसारक संस्थेच्य मुख्य शाखेत ताब्या घेण्यासाठी आलेल्या भोईटे गटाच्या सदस्यांनी संस्थेचा मुख्य दरवाजा तोडून कर्मचारी पराग कदम याला मारहाण केली होती. मारहाणीत त्याच्या खिशातील ५ हजार रुपये व गळ्यातील ५० हजार रुपयांची चेन गहाळ झाली होती. याप्रकाराबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार देऊनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे नरेंद्र पाटील व पराग कदम यांनी खंडपीठात न्या. वराडे व न्या. कणकावले यांच्या न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. याप्रकरणी खंडपीठाने गृह विभागाचे सचिव, पोलिस अधीक्षक, जिल्हापेठ पोलिस निरीक्षक यांना नोटीस बजावली असून, हे प्रकरण आता पोलिसांच्या अंगलट येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज