अ‍ॅपशहर

धर्मसभेला बहुजन संघटनांचा विरोध

कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणातील संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी यांची जळगाव शहरात आज(दि. २७) धर्मसभा होत आहे. या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी न देता संभाजी भिडे यांना जळगाव जिल्हा बंदी करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जल्ह्यातील बहुजन संघटनांनी केली आहे.

Maharashtra Times 27 May 2018, 4:00 am
भिडे यांना जिल्हाबंदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bahujan sanghtna apposed dharmsabha at jalgaon
धर्मसभेला बहुजन संघटनांचा विरोध


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणातील संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी यांची जळगाव शहरात आज(दि. २७) धर्मसभा होत आहे. या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी न देता संभाजी भिडे यांना जळगाव जिल्हा बंदी करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जल्ह्यातील बहुजन संघटनांनी केली आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना भारिप बहुजन महासंघासह विविध संघटनांनी निवेदन देऊन आज होणाऱ्या भिडे यांच्या धर्मसभेला विरोध दर्शविला आहे. संभाजी भिडे यांच्या सभेमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. शहर व जिल्ह्यतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन त्यांच्या सभेला नरवानगी नाकारून आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा, त्यांची सभा हाणून पाडण्यात येईल. यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारादेखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

लोकजनशक्तीचेही निवेदन
शहरात आज, होणाऱ्या धर्मसभेला लोक जनशक्ती पार्टीनेही विरोध केला आहे. या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना पार्टीकडून देण्यात आले आहे. ही सभा झाल्यास सर्व दलित व बहुजन बांधव रास्ता रोको व रेल रोको करतील असा इशारा लोकजनशक्ती पार्टीने दिला आहे. विधान परिषद आचारसंहिता असताना या सभेला कशी परवानगी देणार, असा प्रश्नदेखील प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून अध्यक्ष भिका सोनवणे, अशोक सपकाळे, अकुंश सोनवणे, दिलीप माळी, मनोज सपकाळे आदींनी उपस्थित केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज