अ‍ॅपशहर

बळीरामपेठ, शन‌पिेठ, सुभाष चौक हॉकर्समुक्त

शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील हॉकर्सचे स्थलांतर करूनही भाजीपाला विक्रेत्यांसह फळविक्रेते मूळ जागेवरच बसत होते. यामुळे महापालिकेने सोमवारी सकाळपासून बळीरामपेठ, शनिपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडसह शनिपेठ परिसर व गल्ल्यांमध्ये धडक मोहीम राबवून हा सर्व परिसर हॉकर्समुक्त केला.

Maharashtra Times 12 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम baliram peth hockers action
बळीरामपेठ, शन‌पिेठ, सुभाष चौक हॉकर्समुक्त


शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील हॉकर्सचे स्थलांतर करूनही भाजीपाला विक्रेत्यांसह फळविक्रेते मूळ जागेवरच बसत होते. यामुळे महापालिकेने सोमवारी सकाळपासून बळीरामपेठ, शनिपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडसह शनिपेठ परिसर व गल्ल्यांमध्ये धडक मोहीम राबवून हा सर्व परिसर हॉकर्समुक्त केला. मोह‌मिेदरम्यान सामान जप्त करण्यावरुन कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये बाचाबाची होवून गोंधळ निर्माण झाला होता.

कारवाई अन् धावपळ

सुभाष चौक, बळीराम पेठ, शिवाजी रोड, सुभाष चौक रस्ता या नेहमीच्या भागात कारवाई करण्यात आली. त्यासह महात्मा गांधी मार्केट तसेच शनिपेठ भिलपुरा चौक, कुंभारवाडा, काट्या फाईल, इस्लामपुरा दुर्गा देवी मंद‌रि परिसर या भागातही विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. मनपाची पथके व वाहने येताच या भागात सकाळपासूनच माल घेवून विक्रेत्यांची धावपळ सुरू झाली. माल जप्त करण्यासाठी कमचाऱ्यांचा आटापीटा तर माल वाचविण्यासाठी विक्रेत्यांची ओढाताण सुरू होती. शनिपेठ परिसराच्या मागील गल्लीतील भाजीपाला जप्त करण्यावरुन अतिक्रमण विभागाचे पथक व विक्रेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता. हॉकर्सनी महापौर ललित कोल्हे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. विक्रेत्यांचे प्रतिनिधी होनाजी चव्हाण यांनी या मोह‌मिेचा निषेध केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज