अ‍ॅपशहर

देशातील विचाराची गंगोत्री काँग्रेसच

देशातील विचाराची गंगोत्री काँग्रेसच आहे. काँग्रेसशिवाय पर्याय नाही. परंतु, काँग्रेसची अवस्था नोकरी गेलेल्या नवरदेवासारखी असल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. रविवारी (दि. २६) ग. स. सोसायटीतर्फे गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी हे उद्गार काढले.

Maharashtra Times 27 Feb 2017, 5:45 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhai jagtap
देशातील विचाराची गंगोत्री काँग्रेसच

देशातील विचाराची गंगोत्री काँग्रेसच आहे. काँग्रेसशिवाय पर्याय नाही. परंतु, काँग्रेसची अवस्था नोकरी गेलेल्या नवरदेवासारखी असल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. रविवारी (दि. २६) ग. स. सोसायटीतर्फे गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी हे उद्गार काढले.

यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विधान परिषदेचे आमदार सुधीर तांबे, आमदार स्मिता वाघ, माजी आमदार शिरीष चौधरी, सहकार गटाचे अध्यक्ष बी. बी. पाटील, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी कपील पवार, जिल्हा बँक संचालक डॉ. सुरेश पाटील, ग. स. सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम बोरोले उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, राज्यात १ लाख ९२ हजार संस्था असतांनाही सहकार क्षेत्र बदनाम झाले आहे. अशा परिस्थितीत ग. स. सोसायटीत सहकार गटाचे बी. बी. पाटील यांच्या पारदर्शी नेतृत्वामुळे संस्थेने सर्वांगीण विकास साधल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी आदर्श शिक्षक, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी व ज्येष्ठ सभासदांसह गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मानवतेचा जिव्हाळा असलेल्या पतपेढीने सहकारातून सामाजिकतेची प्रबोधिनी सुरू केली आहे, असे मत आमदार सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी तर आभार उपाध्यक्ष महेश पाटील यांनी मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज