अ‍ॅपशहर

अतिक्रमण काढण्यावरून भजे गल्लीत गोंधळ

जळगाव शहरातील भजे गल्लीत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी (दि. १७) मोहीम राबवून हातगाड्या जप्त केल्या. यावरून विक्रेते व पथकातील कर्मचारी यांच्यात वाद झाल्याने काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता.

Maharashtra Times 18 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhaje galli encraochment issue at jalgaon
अतिक्रमण काढण्यावरून भजे गल्लीत गोंधळ


जळगाव शहरातील भजे गल्लीत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी (दि. १७) मोहीम राबवून हातगाड्या जप्त केल्या. यावरून विक्रेते व पथकातील कर्मचारी यांच्यात वाद झाल्याने काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता.

जळगाव शहरातील नवीन बस स्थानकाला लागून असलेल्या भजे गल्लीत गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण वाढले आहे. याठिकाणी फळ विक्रेते बसतात, तसेच अनेक हातगाड्यादेखील लागतात. बस स्थानकाचा परिसर असल्याने या रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ असते. मात्र, अतिक्रमणामुळे कायम या गल्लीत वाहतुकीची कोंडी होत असते. याबाबत गुरुवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाला अतिक्रमण काढण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. त्यानुसार दुपारी अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक एच. एम. खान यांच्या आदेशाने भजे गल्लीत अचानक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. त्यापूर्वी विक्रेत्यांना सूचना दिल्याची माहिती विभागाने दिली.

शाब्दिक चकमक व बाचाबाची

अतिक्रमण निर्मूलन पथक येताच भजे गल्लीतील अतिक्रमण धारकांमध्ये एकच धावपळ उडाली. पथकाला पाहून टोपल्या, हातगाड्या घेऊन विक्रेते धावू लागल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वाहनातून आलेल्या पथकाने तेथे पोहचून हातगाड्या व विक्रेत्यांनी ठेवलेल्या वस्तूंचे टोपले जप्त करण्यास सुरुवात केली. यावरून विक्रेते व पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू झाले. जप्त केलेला सामान विक्रेत्यांनी परत घेण्याचा प्रयत्न केल्याने सामानाची हिसकाहिसकी सुरू झाली. यावरून पथकातील कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये बाचाबाची झाली. कर्मचारी विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमकीदेखील घडल्या. काही विक्रेते जप्त केलेला सामान परत घेण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वाहनामागे पळत सुटल्याने गोंधळात भर पडली. अखेर अतिक्रमण विभागाने सर्व सामान जप्त करून पालिकेत आणला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज