अ‍ॅपशहर

भुसावळात जुगारींवर छापा

भुसावळ तालुक्यातील खडका व फेकरी येथे शनिवारी (दि. २९) पहाटे दोन वाजेच्या सुमारास जुगाराच्या अड्डयावर अचानक छापा टाकून ५६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra Times 30 Apr 2017, 4:00 am
जळगाव : भुसावळ तालुक्यातील खडका व फेकरी येथे शनिवारी (दि. २९) पहाटे दोन वाजेच्या सुमारास जुगाराच्या अड्डयावर अचानक छापा टाकून ५६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhusawal city crime
भुसावळात जुगारींवर छापा


भुसावळ तालुक्यातील खडका येथील ग्रामपंचायतीजवळील राम मंदिराजवळ सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पहिली कारवाई करण्यात आली. यामध्ये ३९ मोबाइलसह पाच दुचाकी असा २ लाख ५६ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन ५० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज