अ‍ॅपशहर

उदय वाघ यांच्यावरील आरोप राष्ट्रवादीचे षडयंत्र

भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आरोप हे चुकीचे आणि खोटे असून, ते राष्ट्रवादीचे एक षडयंत्र आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध नोंदवत भाजपकडून मंगळवारी (दि. १९) तहसीलदार कैलास देवरे यांना निवेदन सोपविण्यात आले.

Maharashtra Times 20 Jun 2018, 4:00 am
चाळीसगावात भाजपकडून राष्ट्रवादीचा निषेध
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp jalgaon district president uday wagh supporters at chalisgaon
उदय वाघ यांच्यावरील आरोप राष्ट्रवादीचे षडयंत्र

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आरोप हे चुकीचे आणि खोटे असून, ते राष्ट्रवादीचे एक षडयंत्र आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध नोंदवत भाजपकडून मंगळवारी (दि. १९) तहसीलदार कैलास देवरे यांना निवेदन सोपविण्यात आले.

जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी हा प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून चांगले काम करीत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून उदय वाघ व भाजपवर चुकीचे व निरर्थक आरोप केले जात आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत. राष्ट्रवादीच्या या आरोपांची योग्य ती चौकशी करावी व सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणीही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, दिनेश बोरसे, नितीन पाटील, स्वप्नील मोरे, नीळकंठ साबणे, रोहण सूर्यवंशी, सुनील निकम, किशोर रणधीर, अरुण जाधव, बंडू पगार, संतोष निकुंभ, गिरीष बऱ्हाटे, अनिल नागरे, नारायण पाटील, सचिन आव्हाड, सुमेरसिंग राजपूत, दादाभाऊ पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज