अ‍ॅपशहर

हृदयविकाराच्या झटक्याने एसटीचालकाचा मृत्यू

एस. टी. बसच्या काचा स्वच्छ करीत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एसटीवरील चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता धरणगाव तालुक्यातील धारशेरी येथे घडली. प्रेमराज भागवत सपकाळे (वय ४१, रा. बांभोरी, ता. धरणगाव) असे मृत चालकाचे नाव आहे.

Maharashtra Times 17 Jul 2018, 12:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bus driver death due to heart attack at dharsheri dharangaon
हृदयविकाराच्या झटक्याने एसटीचालकाचा मृत्यू


एस. टी. बसच्या काचा स्वच्छ करीत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एसटीवरील चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता धरणगाव तालुक्यातील धारशेरी येथे घडली. प्रेमराज भागवत सपकाळे (वय ४१, रा. बांभोरी, ता. धरणगाव) असे मृत चालकाचे नाव आहे.

प्रेमराज सपकाळे यांची रविवारी धारशेरी मुक्कामी बसवर ड्युटी होती. सहकारी वाहक जाधव व सपकाळे दोघेजण बसमध्येच झोपले होते. सोमवारी सकाळी सहा वाजता बसच्या काचा स्वच्छ करीत असताना अचानक त्रास होऊ लागला. काही क्षणातच त्यांना उलटी झाली. वाहक जाधव यांनी आरडाओरड करून गावकऱ्यांची बोलावून घेतले. गावात डॉक्टर उपलब्ध न झाल्याने सपकाळे यांना तातडीने दुसऱ्या वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. सपकाळे यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर एस. टी. महामंडळातील सहकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सपकाळे यांच्या पश्चात पत्नी राणुबाई, मुलगी कल्याणी, पूजा व मुलगा शिवम असा परिवार आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर सपकाळे यांचा मृतदेह बांभोरी येथे नेण्यात आला.

ट्रॅक्टरचालकाची आत्महत्या

तालुक्यातील उमाळा येथे ट्रॅक्टर चालकाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली. सुदाम हरी भील (वय ४५) असे या टॅक्टरचालकाचे नाव आहे. सुदाम हा रविवारी दारूच्या नशेत होता. पत्नीशी वाद झाल्याने त्या संतापात त्याने रात्री ९ वाजता विषप्राशन केले. मुलांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता रात्री १२ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनोहर पाटील यांच्याकडे तो ट्रॅक्टरवर चालक होता. सोमवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मनोहर पाटील, उमाळा येथील सरपंच सुकलाल तुकाराम भील व दीपक पवार यांनी बाजार समितीची शववाहिका आणून मृतदेह गावात नेला. सुदाम यांच्या पश्चात पत्नी देवकाबाई, मुलगा अजय, सोनू, सुकलाल व अतुल असा परिवार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज