अ‍ॅपशहर

कॅरिबॅगविरोधात पुन्हा मोहीम

जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात प्लॉस्ट‌किच्या कॅरीबॅगचा वापर केला जात आहे. त्यामुळे पुन्हा ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्ट‌कि कॅरीबॅगविरोधात मोहीम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Maharashtra Times 4 Nov 2017, 4:19 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम carry bag ban in jalgaon
कॅरिबॅगविरोधात पुन्हा मोहीम


जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात प्लॉस्ट‌किच्या कॅरीबॅगचा वापर केला जात आहे. त्यामुळे पुन्हा ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्ट‌कि कॅरीबॅगविरोधात मोहीम सुरू करण्याच्या सूचना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत दिल्या. अवघ्या २० मिनिटांत विषयपत्रिकेवरील १० विषयांना मंजुरी देवून सभा गुंडाळण्यात आली.

स्थायी सभेच्या व्यासपीठावर सभापती ज्योती इंगळे, आयुक्त निंबाळकर, अप्पर आयुक्त राजेश कानडे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, शहर अभियंता डी. बी. दाभाडे, लक्ष्मीकांत कहार उपस्थित होते. सभेत नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी प्रशासनाने दिवाळीपूर्वी प्लॉस्टिकच्या कॅरीबॅगविरोधी मोहीम केली होती. जप्त केलल्या मालाची विल्हेवाट कशी लावली? असे विचारले. तसेच कॅरिबॅगचा वापर वाढल्यामुळे गटारी तुंबण्याचे प्रकार वाढल्याची समस्या मांडली. त्यावर निंबाळकर यांनी तत्काळ ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगविरोधात मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्यात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज