अ‍ॅपशहर

समांतर रस्त्यांसाठी गुरुवारपासून उपोषण

जळगाव शहरांतर्गत महामार्ग लगत समांतर रस्ते तयार करण्याच्या कामासह महामार्ग विस्ताराचा डीपीआर मंजूर करून त्याची निविदा प्रसिद्धीचे पत्रासाठी समांतर कृती समिती आक्रमक झाली आहे. समितीने यासाठी गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेदहा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्याचा एल्गार जळगावकरांनी व्यक्त केला.

Maharashtra Times 13 Nov 2018, 5:00 am
शहरातील ५० संघटनांचा पाठिंबा; कृती समितीचा निर्णय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chain fast agitation start for service road issue in jalgaon city
समांतर रस्त्यांसाठी गुरुवारपासून उपोषण


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव शहरांतर्गत महामार्ग लगत समांतर रस्ते तयार करण्याच्या कामासह महामार्ग विस्ताराचा डीपीआर मंजूर करून त्याची निविदा प्रसिद्धीचे पत्रासाठी समांतर कृती समिती आक्रमक झाली आहे. समितीने यासाठी गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेदहा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्याचा एल्गार जळगावकरांनी व्यक्त केला.

समांतर रस्ते कृती समितीने साखळी उपोषण आंदोलन नियोजनासाठी नुकतीच कांताई सभागृहाच्या प्रांगणात बैठक घेतली. या बैठकीस विविध संघटना, संस्था व मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. राधेशाम चौधरी यांनी केले. समांतर रस्ते मागणीसाठीच्या आंदोलनांचे विविध टप्पे सांगून समांतर रस्ते कृती समितीचे आंदोलन बिगर राजकीय व बिगर श्रेयाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१०० दिवस साखळी उपोषण
आदोलनात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हवा, हे आंदोलन किमान १०० दिवस चालवायचे असेल तर सर्वच घटकातील संघटना, संस्था यांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले. साखळी उपोषण आंदोलनात पहिल्या टप्प्यात सामान्य नागरिकांचा सहभाग हवा. साखळी उपोषणात रोज वेगवेगळ्या नागरिकांनी उपस्थिती द्यावी, अशी सूचना आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी केली.

ठोस कामाशिवाय माघार नाही
मध्यंतरी आश्वासनांचे गाजर मिळत गेल्याने आंदोलन थंडावले. परंतु, आता कामाला प्रारंभ झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असे नगरसेवक अनंत जोशी म्हणाले. समांतर रस्ते कृती समितीच्या आंदोलानात राजकीय जोडे बाहेरच ठेवावेत आणि केवळ आश्वासनावर थांबू नये, असे राजू मोरे म्हणाले. महामार्गावर अपघातात जाणारे बळी लक्षात घेऊन आता तरी आंदोलनात सातत्य ठेवण्याचा निर्धार करा, असे अश्पाक पिंजारी म्हणाले. व्यक्ती म्हणून आणि अपघातात बळी गेलेल्या परिवारातील घटक म्हणून सहभागी होत असल्याचे प्रा. डॉ. अस्मिता पाटील म्हणाल्या. अपघातात बळी गेल्या व्यक्तिंच्या कुटुंबीयांना उपोषणात सहभागी करा, असे विजय वाणी म्हणाले. आंदोलन करायचे असेल तर कृती समितीने यापुढे इतर संघटनांना कृती करण्याचा संदेश द्यावा, विनंती करण्यात वेळ घालवू नये अशी सूचना सुनील पाटील यांनी केली. चर्चेत वासुदेव राणे, जितेंद्र बागरे, नाना मराठे, उमाकांत वाणी आदींनी सहभाग घेतला. आजपर्यंत ५० वर संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असून, हातात २० संघटनांची पत्रे आली असल्याचे फारुक शेख म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज