अ‍ॅपशहर

गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक पकडला

चाळीसगावकडून औरंगाबादकडे जाणारा व कत्तलीच्या इराद्याने अत्यंत निर्दयतेने गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पकडला. चाळीसगाव-धुळे महामार्ग क्र. २११ वरील कन्नड घाटाच्या पायथ्याशी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी टेम्पो जप्त करीत ५ गायी व एक वासरू ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Times 24 Jul 2018, 5:00 am
चाळीसगाव : चाळीसगावकडून औरंगाबादकडे जाणारा व कत्तलीच्या इराद्याने अत्यंत निर्दयतेने गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पकडला. चाळीसगाव-धुळे महामार्ग क्र. २११ वरील कन्नड घाटाच्या पायथ्याशी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी टेम्पो जप्त करीत ५ गायी व एक वासरू ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chalisgaon action on tempo of cows transport
गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक पकडला


चाळीसगाव-धुळे महामार्ग क्र. २११ वर टेम्पो (एमएच. ०४ एफडी. ९५६६) औरंगाबादच्या दिशेने चालला होता. कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बोढरे फाट्याजवळ बजरंग दलाचे कार्यकर्ते शांताराम दिलीप आगोणे यांना पाच गाई व एक वासरू गाडीत कोंबून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्यांना संशय आल्याने त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळविले. पोलिसांनी टेम्पोचा चालक सुल्तान खान हमीद खान (वय २६, रा. चौधरीवाडा, चाळीसगाव) यास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी शांताराम आगोणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला असून, पोलिसांनी चालकाला नायालयात उभे केले. यामध्ये चालकाला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज