अ‍ॅपशहर

अल्पवयीन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील अल्पवयीन प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) घडली. रितेश रामदास झोडगे (वय १७) आणि सोनल कुंदन ढोले (वय १५) असे या अल्पवयीनांचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना उघडकीस आली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Times 28 Jan 2018, 4:00 am
एकाच दोरीने घेतला गळफास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ritesh zodge chalisgaon


म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील अल्पवयीन प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) घडली. रितेश रामदास झोडगे (वय १७) आणि सोनल कुंदन ढोले (वय १५) असे या अल्पवयीनांचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना उघडकीस आली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बहाळ येथील रितेश झोडगे हा कोळगाव येथे अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. सोनल ढोले ही बहाळ येथील माध्यमिक शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. प्रजासत्ताक दिनाच्या लेझीम पथकात सोनलने मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. रितेश हा शौचास जातो असे सांगून शुक्रवारी (दि. २६) रात्री घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरा या दोघांना दुचाकीवर शेताकडे जाताना गावातील महिलांनी पाहिले होते. रितेश हा बराच वेळ घरी न आल्याने त्याची शोधाशोध सुरू होती. यादरम्यान, दोघांचे मृतदेह गावापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर गुढे रस्त्यावरील रितेशच्या वडीलांची लिंबुची बागेतील पेरूच्या झाडाला एकत्रित गळफास घेतल्याच्या स्थितीत पहाटे दोन वाजता आढळले. सोनलचे वडील स्वयंपाकी असून, तिच्या पश्चात आई, वडील व दोन लहान भाऊ असा परिवार आहे. रितेशच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. घटनेनंतर बहाळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी रामदास झोडगे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पृथ्वीराज कुमावत करीत आहेत. चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. गळफास घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी बी. पी. बाविस्कर यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज