अ‍ॅपशहर

गाळेधारकांना प्रीमियममध्ये दिलासा

महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या लिलावासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, प्रीमियम आकारणी करण्याबाबत प्रशासनाकडून खल सुरू होता. अखेर लिलावातील अंतिम बोलीच्या रकमेनुसार ५० टक्के प्रीमियम आणि ८ टक्के वार्षिक भाडे आकारणीचा निर्णय घेण्याचे प्रशासनाने निश्‍चित केले असल्याचे समजते.

Maharashtra Times 16 Mar 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम charges under final bid amount to jalgaon city market shoppers by jalgaon municipal corporation
गाळेधारकांना प्रीमियममध्ये दिलासा


महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या लिलावासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, प्रीमियमची आकारणी करण्याबाबत प्रशासनाकडून खल सुरू होता. अखेर लिलावातील अंतिम बोलीच्या रकमेनुसार ५० टक्के प्रीमियम आणि ८ टक्के वार्षिक भाडे आकारणीचा निर्णय घेण्याचे प्रशासनाने निश्चित केले असल्याचे समजते.

या पूर्ण प्रकरणात गाळेधारकांकडून १०० टक्के की, ५० टक्के प्रीमियमची आकारणी करायची याबाबत प्रशासनाकडून खल सुरू होता. अखेर महापालिकेच्या आणि गाळेधारकांच्या हितासाठी समन्वयाने तोडगा काढण्यात आला. त्यामध्ये गाळेलिलाव प्रक्रियेतील त्या-त्या गाळ्यांच्या अंतिम बोलीनुसार ५० टक्के प्रीमियम आणि ८ टक्के वार्षिक भाडे आकारणीचा निर्णय निश्चित करण्यात आला. त्यामुळे आता गाळेधारकांनादेखील दिलासा मिळणार आहे.

शहरातील २३८७ गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर या गाळ्यांची लिलावाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच २०१२ पासून ते डिसेंबर २०१७ पर्यंत थकीत भाडेबील गाळेधारकांना वितरित करण्यात आले असून, गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून दिलेल्या बिलातील रकमेपैकी काही रक्कम धनादेशाद्वारे भरली आहे. परंतु, जोपर्यंत रेडीरेकनरनुसार बिलांची रक्कम पूर्ण भरणार नाही. तोपर्यंत लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, अशी न्यायालयाच्या निकालात अटी-शर्ती आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी पूर्ण रक्कम भरणे अपेक्षित आहे. या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना डिसेंबर २०१७ पर्यंत बिले वितरित केली होती. उर्वरित जानेवारी ते मार्च तीन महिन्यांची बिले येत्या दोन-तीन दिवसांत वितरित केले जाणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज