अ‍ॅपशहर

‘चेतक’चे उत्तम ब्रॅडिंग

पर्यटन विभागाने चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडिंग केल्याने हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख आणि सर्वात मोठे आकर्षण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Maharashtra Times 27 Dec 2018, 5:00 am
सारंगखेडा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम CM_SARANGKHEDA 26 DEC m (18)


म. टा. वृत्तसेवा, धुळे

पर्यटन विभागाने चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडिंग केल्याने हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख आणि सर्वात मोठे आकर्षण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक महोत्सवांतर्गत बुधवारी (दि. २६) आयोजित अश्वस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री तथा नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, दोंडाईचा नगराध्यक्षा नयनकुवर रावल, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चेतक महोत्सव घोड्यांचा ऐतिहासिक सोहळा आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक महोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत. चांगल्या प्रसिद्धीमुळे हा महोत्सव खऱ्या अर्थाने जागतिक झाला आहे. एक कोटी किंमतीपेक्षा अधिक किंमतीचे घोडे महोत्सवात येत आहेत. येथील एकमुखी दत्ताच्या आशीर्वादाने महोत्सवाचा अधिक विस्तार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांचे सहकार्य असून, शुभेच्छा देण्यासाठी ते सारंगखेडा येथे आले असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच अकोला येथून महोत्सवासाठी घोडेस्वारी करीत आलेल्या अकरावर्षीय राजवीरसिंह नागरा या बालकाचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अश्वस्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी अश्व खेळ आणि अश्वनृत्याची पाहणी केली. यातील साहसी खेळ प्रकाराबाबत कौतुकोद्गार काढले. तसेच बचतगट प्रदर्शनाची पाहणी देखील केली.

टेन्ट सिटीची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तापी नदीच्या तिरावर पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या टेन्ट सिटीची पाहणी केली. या राहुट्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पर्यटकांसाठी सर्व सुविधा असलेले रेस्टॉरंट, स्पा, एसी आणि नॉन एसी टेंट, दोन दरबारी टेंट, कॅरम, चेस आणि बिलीअर्डस यांसारख्या खेळांचीदेखील सुविधा करण्यात आली आहे. दरबारी टेन्टमधील सुविधा लक्षात घेता यामुळे याठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटक चेतक महोत्सवाकडे आकर्षित होतील, असेही मुख्यंमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज