अ‍ॅपशहर

शहर स्वच्छतेची ऐसीतैशी!

महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या दैनंदिन साफसफाईच्या कामात ढीसाळपणा वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेकडे असलेल्या कचरा संकलनाच्या वाहनांपैकी तब्बल १८ वाहने नादुरुस्त झाली आहेत. विशेष म्हणजे, ती वाहने पडून राहिल्याने कचरा संकलनाच्या कामावर परिणाम झाला आहे. या वाहनांची दुरुस्ती केल्यानंतरच कचरा संकलनास गती येणार असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने वरिष्ठांकडे दिला आहे.

Maharashtra Times 27 Apr 2019, 5:00 am
कचरासंकलन वाहने धूळ खात; कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_4334


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या दैनंदिन साफसफाईच्या कामात ढीसाळपणा वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेकडे असलेल्या कचरा संकलनाच्या वाहनांपैकी तब्बल १८ वाहने नादुरुस्त झाली आहेत. विशेष म्हणजे, ती वाहने पडून राहिल्याने कचरा संकलनाच्या कामावर परिणाम झाला आहे. या वाहनांची दुरुस्ती केल्यानंतरच कचरा संकलनास गती येणार असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने वरिष्ठांकडे दिला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे साफसफाईसाठी व कचरा उचलण्यासाठी असलेल्या वाहनांपैकी अनेक वाहने नादुरुस्त झाली आहेत. वाहन विभागाकडून या वाहनांची दुरुस्ती केली जात नसल्याने किरकोळ दुरुस्तीसाठीदेखील वाहने बंदच आहेत. त्यामुळे दररोजच्या कचरा संकलनाच्या कामावर परिणाम झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अनेक भागातील कचऱ्याचे संकलन केले जात नाही.

गेल्या पंधरा दिवसांपासून वाहने नादुरुस्तीचे प्रमाण वाढल्याने शहरातील अनेक ठिकाणी साचलेला कचरा उचलणे वाहन यंत्रणेअभावी अवघड झाले आहे. मनपाचा हंजीर बायोटेक हा कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे तेथेही सुमारे लाखो टन कचरा प्रक्रियेविना पडून आहे. या साचलेल्या कचऱ्याने जळगावकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात मलेरिया, डेंग्यूसह विषाणूंमुळे होणाऱ्या साथींच्या आजाराची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

त्वरित दुरुस्ती करावी
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कचरा संकलनासाठी वापरली जाणारी १८ वाहने नादुरुस्त आहेत. याबाबतचे पत्र आरोग्य विभागाने वरिष्ठांकडे पाठवले असून, त्यात त्यांनी अनेक भागात कचरा संकलन केले जात नसल्याने नागरिकांच्या व नगरसेवकांच्या तक्रारी येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वाहन विभागाला या वाहनांची दुरुस्ती त्वरित करण्याच्या सूचना देऊन दुरुस्त वाहने आरोग्य विभागाकडे द्यावीत, असेही या पत्रात म्हटले आहे.

नवीन वाहने पडूनच
‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत मंजूर घनकचरा व्यवस्थापनाच्या डीपीआरच्या निधीमधून जळगाव महापालिकेने दोन जेसीबी, २.५ टनाच्या २५ तर ३.२ टनाच्या ६० घंटागाड्या अशा सूमारे ८७ वाहनांची खरेदी केली आहे. ही खरेदी केलेली वाहने महापालिकेकडे दाखल होऊन महिना पूर्ण झाला मात्र, त्यांची आरटीओकडे नोंदणी पूर्ण न झाल्याने त्या वाहनांचा वापर सुरू होऊ शकलेला नाही. परिणामी, ती वाहने महापालिकेच्या आवारात नुसती पडून आहेत.

नादुरुस्त वाहनसंख्या
घंटागाड्या ... ८
काम्पॅक्टर ... ३
स्कीप लोडर ... ३
ट्रॅक्टर लोडर / टीप्पर ... ४

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज