अ‍ॅपशहर

समतानगरात स्वच्छता अभियान

सर्वत्र दीपोत्सवाची धामधूम सुरू असतांना ‘स्वय: नागरिक स्वच्छता अभियान मोहीम’ याअंतर्गत समता नगरमधील जवळपास ५ हजार लोकवस्तीत नागरिकांनी ‘आरोग्य धनसंपदा’या ब्रीदवाक्याचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संपूर्ण परिसर स्वच्छ केला.

Maharashtra Times 18 Oct 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cleaning campaign at samat nagar jalgaon
समतानगरात स्वच्छता अभियान


सर्वत्र दीपोत्सवाची धामधूम सुरू असतांना ‘स्वय: नागरिक स्वच्छता अभियान मोहीम’ याअंतर्गत समता नगरमधील जवळपास ५ हजार लोकवस्तीत नागरिकांनी ‘आरोग्य धनसंपदा’या ब्रीदवाक्याचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संपूर्ण परिसर स्वच्छ केला.

समतानगरवासियांना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यकर्ते नितीन तायडे, दिनकर अडकमोल, डी. एन. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. ‘स्वच्छ, सुंदर आपले समता नगर’हे एकमात्र ध्येय बाळगून समतानगर येथील नागरिकांनी मंगळवारी (दि. १७) सकाळी ७ वाजेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत परिसराची स्वच्छता केली. नागरिकांच्या श्रमदानातून १० ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यात येऊन कचऱ्याची पूर्ण विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी समस्त समतानगरमधील जनकल्याण युवा फाउंडेशन, समता समाज मित्रमंडळ, पंचशील मित्रमंडळ, बजरंग मित्रमंडळ, छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ यासह जागरूक नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. परिसरातील ७५ युवकांनी श्रमदान केले. त्यानंतर डेंग्यू, मलेरिया, हिवताप या आजाराविषयी नागरिकांत जागृती करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज