अ‍ॅपशहर

स्वच्छता मोहीम आजपासून

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे, बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या साह्याने शनिवार (दि. २२) पासून प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम सुरू करा. मी स्वत: त्याठिकाणी थांबेल, तसेच वसुलीचे बिले तयार करण्यासाठी शनिवार व रविवार महापालिका सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.

Maharashtra Times 22 Jul 2017, 4:00 am
सह्याजीरावांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cleanliness campaign from today ward in jalgaon city
स्वच्छता मोहीम आजपासून


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे, बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या साह्याने शनिवार (दि. २२) पासून प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम सुरू करा. मी स्वत: त्याठिकाणी थांबेल, तसेच वसुलीचे बिले तयार करण्यासाठी शनिवार व रविवार महापालिका सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. यावेळी त्यांनी पदाधिकारी यांच्या सह्या करून घरी जाणाऱ्या नातेवाईकांची नावे गुप्तपणे देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.

महापालिकेची स्थायी समितीची सभा झाल्यानंतर सदस्यांनी सभेत ज्या तक्रारी केल्या. त्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी त्याच सभागृहात सदस्य गेल्यानंतर प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नावरून अधिकाऱ्यांना रडारवर घेतले. काही पदाधिकारी यांचे नातेवाईक सह्या करून घरी जातात. त्यांना तुम्ही बोलू शकत नसाल तर मला गुप्तपणे त्यांची नावे कळवा, असे आवाहनही त्यांनी केले. आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचारी यांच्या गैरहजेरीबाबत त्यांनी आरोग्य अधिकारी यांना विचारणा केली. विना परवानगी जर कुणी गैरहजर राहत असेल तर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करा, असे सांगितले.

प्रत्येक प्रभागासाठी धुरळणी यंत्र

महापालिकेकडे केवळ ५ धुरळणी यंत्र असल्याने ते पूरणार नाहीत म्हणून तात्काळ ३७ प्रभागांसाठी प्रत्येकी धुरळणी यंत्र घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच शहरात कचरा कंटेनर कमी आहेत. जे आहेत. त्यांची परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कचरा कंटेनर घेण्याचेही त्यांनी आरोग्य अधिकारी याना सांगितले.

कॅरीबॅग बंदीसाठी मोहीम

जळगाव शहरात कॅरीबॅगची मोठी समस्या आहे. त्यामुळे तात्काळ कॅरीबॅग बंदीची मोहीम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पथदिवे दुरुस्तीसाठी एकच वाहन असल्याने त्याच्या वेळेचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जळगाव शहरातील फुले मार्केटमधील अतिक्रमण काढण्याच्या सूचना हॉकर्सला द्या अन्यथा मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत मोहीम वापरून त्यांचा सामान जप्त करण्याचेही त्यांनी सांगितले. दाणाबाजार, जुन्या सानेगुरुजी रुग्णालयाची जागा येथील स्वच्छतेची काल गुरुवारी रात्री पाहणी केल्याचे सांगून तेथे स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. शनिवारपासून ४ दिवस प्रभागानुसार दररोज संपूर्ण फौजफाटा घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. सदस्यांच्या ट्रॅक्टरबाबत तक्रारी असल्याने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पाण्याचे टँकर भाड्याने लावण्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज