अ‍ॅपशहर

महाविकास आघाडीत कोणतंही अंतर नाही: उद्धव ठाकरे

पवार-ठाकरे यांच्यामध्ये शेतकरी आहे आणि शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतंही अंतर नाही, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'आमचं बरं चाललंय' असाच संदेश आज दिला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Feb 2020, 4:54 pm
जळगाव: पवार-ठाकरे यांच्यामध्ये शेतकरी आहे आणि शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतंही अंतर नाही, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'आमचं बरं चाललंय' असाच संदेश आज दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav-thackeray


जळगावमधील जैन हिल्स येथे आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिला. शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, आता राज्यात तुमचे सरकार आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला काहीही काळजी करण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमुक्तीवरही मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला हमी दिली. कर्जमुक्तीची सुरुवात पुढील महिन्यात होईल. कर्जमुक्ती हा प्रथमोपचार आहे. कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्याला कायमचं बाहेर काढणं हे आमचं लक्ष्य असून हे सरकार निश्चितच शेतकऱ्याला कर्जमुक्ती देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भीमा-कोरेगावचा तपास केंद्राला देणं अयोग्यच

कार्यक्रमाला प्रतिभाताई पवार यांची उपस्थिती होती. त्यांचा उल्लेख करत माझ्या शपथविधीला प्रतिभाताई आल्या होत्या. त्यानंतर आज या कार्यक्रमाला त्या आल्या आहेत. त्यामुळेच 'महाविकास आघाडीत अंतर पडलं' असं उद्याच्या पेपरमध्ये पुन्हा छापून आलं तरी आमच्यामध्ये बळीराजा सपत्नीक आहे. शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे. हेच खरं, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.

भाजपला सत्ता गेल्याचे अतीव दु:ख: मुश्रीफ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी पाणीसमस्येवर बोट ठेवले. राज्यात मराठवाडा, खान्देश हा तहानलेला भाग असून केंद्र व राज्य सरकारने या समस्येवर मात करून प्रत्येक भागाला पाणी पोहोचेल अशा योजना आखाव्या, असे आवाहन पवार यांनी केले. देशाच्या प्रगतीत वैज्ञानिकांएवढेच योगदान काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचे आहे, असे पवार म्हणाले.

यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

असं करू नका, राज यांचं इंग्रजी शाळांना सांगणं

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज