अ‍ॅपशहर

भंगार बाजारात कोम्बिंग ऑपरेशन

शहरातील भंगार बाजारात कोम्बिंग ऑपरेशन करीत डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या पथकाने गुरुवारी १३ दुचाकी, ऑटोनगरातून सहा ट्रक व दोन ट्रॅव्हल्स अशी २१ वाहने ताब्यात घेतली आहे. त्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर ती योग्य असतील तर वाहने सोडण्यात येणार आहेत.

Maharashtra Times 21 Apr 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम combing operation in scrap market jalgaon
भंगार बाजारात कोम्बिंग ऑपरेशन


शहरातील भंगार बाजारात कोम्बिंग ऑपरेशन करीत डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या पथकाने गुरुवारी १३ दुचाकी, ऑटोनगरातून सहा ट्रक व दोन ट्रॅव्हल्स अशी २१ वाहने ताब्यात घेतली आहे. त्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर ती योग्य असतील तर वाहने सोडण्यात येणार आहेत. कागदपत्रे मिळाली नाही तर ज्यांच्याकडे सापडली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती डीवायएसपी सांगळे यांनी दिली.

अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या भंगार बाजार आणि ऑटोनगरातील भंगार बाजारात गुरुवारी, सकाळी ११ वाजता ऑपरेशन सुरू करण्यात आले. एकाच वेळी सर्व दुकानांची तपासणी सुरू झाली.

कारवाईत एमआयडीसी पोलिसांच्या पथकासह, रामानंद नगर, शहर आणि शनीपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच आरसीपी प्लाटून, दंगल नियंत्रण पथक, क्यूआरटी फोर्स यांची मदत घेतली. कारवाईच्या भीतीने काही जण दुकानांना कुलूप लावून पसार झाले. दुकानांचे शटर बंद असल्याचे बघून सांगळे यांनी दुकानमालकांना बोलावून दुकाने उघडण्यास सांगितले. भंगाराच्या गोदांमामध्ये ठेवलेले इंजिन, चेचीस तसेच इतर साहित्य तपासून त्यांचे क्रमांकही बघितले. ज्यांचे क्रमांक नव्हते त्यांचे स्पष्टीकरणही पोलिसांनी मागितले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज