अ‍ॅपशहर

तीन वर्षांनंतरही ‘अच्छे दिन’दूरच

केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले तरीदेखील देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ न आल्याने जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे शनिवारी (दि. २७) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

Maharashtra Times 28 May 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress andolan at jalgaon against bjp government
तीन वर्षांनंतरही ‘अच्छे दिन’दूरच


केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले तरीदेखील देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ न आल्याने जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे शनिवारी (दि. २७) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

जिल्हा काँग्रेसने दिलेल्या निवेदनात, केंद्रातील मोदी सरकारने नुसत्या घोषणा व पोकळ आश्वासने दिली. नोटबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये ४० टक्के वाढ झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शेतमालाला आधार भाव नाही. जनता महागाईने होरपळून निघत आहे. पेट्रोलचे भाव वाढलेलेच आहे. त्यामुळे तीन वर्षानंतरही जनतेला ‘अच्छे दिन’आले नसल्याने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, अॅड. ललिता पाटील, दिलीप पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, शरद महाजन, मालोजी पाटील, रतिलाल चौधरी, अॅड. अविनाश भालेराव, राजेंद्र महाजन, उल्हास साबळे, विष्णू घोडेस्वार उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज