म. टा. प्रतिनिधी, जळगाव
दिल्ली येथे आज शनिवारी राहुल गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ४९ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचा जळगाव शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जल्लोष केला.
शहरातील काँग्रेस भवनसमोर फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात जळगाव शहर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, माजी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. सलीम पटेल यांनी तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला. या आनंदोत्सवात श्याम तायडे, सेवादलाचे राजस कोतवाल, जमील शेख, मनोज चौधरी, बाबा देशमुख, अमजद पठाण, तुळशीराम जाधव, विशाल पवार, दीपक सोनवणे, प्रदीप सोनवणे, शशी तायडे, शोएब पटेल, जाकीर बागवान, ज्ञानेश्वर सोनवणे, जगदीश गाडे, अय्याज शेख सुभाष ठाकरे, संजय राजपूत आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.