अ‍ॅपशहर

अत्यानंदामुळे काँग्रेस कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्याने अतिआनंदामुळे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पारोळा तालुक्यातील वंजारी गावात ही घटना घडली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Dec 2018, 1:35 pm
जळगाव:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress-worker

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्याने अतिआनंदामुळे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पारोळा तालुक्यातील वंजारी गावात ही घटना घडली आहे.

सुरेश सुका ठाकरे (वय ७२) असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे. ते काँग्रेसचे पारोळा तालुका अध्यक्ष आहेत. निवडणूक निकालाच्या दिवशी टीव्हीवर पाच राज्यांचे निकाल पाहत असताना काँग्रेसला मिळालेल्या यशाने त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यानंतर काँग्रेसचे नेते पिरन अनुष्ठान यांनी ठाकरे यांना फोन करून विजय उत्सव साजरा करण्यासाठी पारोळा येथे येण्याचा निरोप दिला. तीन राज्यांत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याचं ऐकत असतानाच ठाकरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांना तात्काळ धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी दुपारपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज