अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांकडून बुद्धिभेद

मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समिती नव्हे ज‌िवाणू समिती असा उल्लेख उपाहासाने केला असला तरी जिवाणू हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, हे त्यांना ठाऊक नसल्याचे शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य एस. बी. पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

Maharashtra Times 19 Aug 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम conspiracy from chief ministers
मुख्यमंत्र्यांकडून बुद्धिभेद


मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समिती नव्हे ज‌िवाणू समिती असा उल्लेख उपाहासाने केला असला तरी जिवाणू हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, हे त्यांना ठाऊक नसल्याचे शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य एस. बी. पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. मुख्यमंत्री खोटी आकडेवारी सांगून ग्रामीण व शहरी असा बुद्धिभेद करीत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. भाजपने निवडुकीच्या काळात शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्या देखील याच होत्या. मग, आता त्या मागण्या केल्या तर आम्ही देशद्रोही कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जळगाव येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सोडून आता शेतकरी सुकाणूलाच विरोधक म्हणून टारगेट केले आहे. स्वामिनाथन आयोगाची मागणी मागच्या सरकारकडे केली होती. त्यांनी मान्य केली नाही म्हणून तर त्यांना घरी जावे लागले, तेव्हा तर तुम्ही आमच्यासोबतच होते ना? असा टोलाही पाटील यांनी लगावला. सुकाणू समितीच्या मागे शेतकरी नाहीत, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: ग्रामीण भागात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान एस. बी. पाटील यांनी दिले.

हे देशद्रोही नव्हे काय?

शासनाची सबसिडी घेवून देखील खतांचे भाव कमी न करणाऱ्या खतांच्या कंपन्या, निर्देशांची अंमलबजावणी न करणारे अधिकारी व बँका, तसेच जमीन विकासासाठी घेतलेले कर्ज कृषी कर्ज भासवणारे अधिकारी व त्यांच्यावर पांघरुण घालणारे मुख्यमंत्री यांच्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यामुळे हे लोक देशद्रोही नव्हे काय? असा प्रश्नही पाटील यांनी विचारला. शासनातील मंत्र्यांना कायदे माहिती नाहीत. एका विषयाचे तीन तीन जीआर काढावे लागतात, असा आरोपही पाटील यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज