अ‍ॅपशहर

कंत्राटी वीज कर्मचारी सोमवारपासून संपावर

कंत्राटी तसेच आऊटसोर्सिंग वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने दुसऱ्या टप्प्यात बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. दि. २२ मे पासून जळगाव जिल्ह्यातील महापारेषण, महानिर्मिती तसेच महावितरण मधील कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगार हे बेमुदत संपावर जाणार आहेत.

Maharashtra Times 19 May 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम contract labor employees to strike on monday
कंत्राटी वीज कर्मचारी सोमवारपासून संपावर

कंत्राटी तसेच आऊटसोर्सिंग वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने दुसऱ्या टप्प्यात बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. दि. २२ मे पासून जळगाव जिल्ह्यातील महापारेषण, महानिर्मिती तसेच महावितरण मधील कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगार हे बेमुदत संपावर जाणार आहेत.

विविध मागण्यांसाठी ४ वर्षांपासून कृती समितीतील संघटनांतर्फे रानडे समिती, अनुराधा भाटिया समितीसमोर संघटनांनी अनेक न्यायालयीन निवाडे सादर केले होते. दुसऱ्या टप्प्यात संघटनांनी २२ मेपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन बंद १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन अरविंद देवरे, विरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज