अ‍ॅपशहर

‘वाहतूक नियम पालनातूनच अपघातांवर नियंत्रण’

कायदे करून समाजाला शिस्त लागत नाही. कायद्याचे प्रबोधन करून सर्वसामान्यांमध्ये ते रुजवावे लागतात. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीनेच अपघातावर नियंत्रण मिळविता येऊ शकते, असे प्रतिपादन राज्याचे विशेष सरकारी वकील डॉ. उज्ज्वल निकम यांनी केले. पोलिस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

Maharashtra Times 22 Jan 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम control on road accident to follow traffic rule
‘वाहतूक नियम पालनातूनच अपघातांवर नियंत्रण’

कायदे करून समाजाला शिस्त लागत नाही. कायद्याचे प्रबोधन करून सर्वसामान्यांमध्ये ते रुजवावे लागतात. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीनेच अपघातावर नियंत्रण मिळविता येऊ शकते, असे प्रतिपादन राज्याचे विशेष सरकारी वकील डॉ. उज्ज्वल निकम यांनी केले. पोलिस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, डीवायएसपी सचिन सांगळे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले. मार्गदर्शन करताना अॅड. निकम यांनी, महामार्गावर बहुतांशी अपघात चालकांच्या चुकींमुळे तसेच निष्काळजीपणामुळे होतात. ते रोखण्यासाठी सर्वांनी विचार करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांन केले. वाहतूकसंबंधी कठोर कायदा करून चालत नाही. तर जनतेचे प्रबोधनही करावे लागते. त्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा अभियान उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात रस्ते अरूंद आणि वाहनांची संख्या जास्त असे चित्र दिसते. त्यामुळे जिल्ह्यात जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे. नियम आणि शिस्तीचे पालन करण्याची मानसिकता झाली पाहिजे अशी अपेक्षा डॉ. सुपेकर यांनी व्यक्त केली. २०१७ हे वर्ष अपघात मुक्त वर्ष म्हणून आपण साजरे करण्यात सगळ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज