अ‍ॅपशहर

जळगावात एकाचा मृ्त्यू; पण नेमका कशामुळं माहीत नाही!

करोनाच्या साथीमुळं प्रत्येक मृत्यूबद्दल संशय उपस्थित होत आहे. जळगावात आज सकाळी एका ७२ वर्षीय करोना संशयित वृद्धाचा मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कशामुळं झाला याची खात्री करण्यासाठी त्याच्या चाचणीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2020, 12:15 pm
जळगाव: येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात करोना कक्षात उपचारासाठी दाखल असलेल्या एका ७२ वर्षीय संशयित रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या रुग्णाचे करोना चाचणीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. मात्र, अद्याप त्याचे अहवाल प्राप्त झाले नसल्याने रुग्णाचा मृत्यू नेमका कशाने झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Death


Live: राज्यात करोना रुग्णांची संख्या २२५ वर

मृत्यू झालेल्या करोना संशयित रुग्णाचा वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत असल्याने गूढ वाढले आहे. मयत रुग्ण हा जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील असून त्यांना कालच (सोमवारी) शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आलेले होते. त्यांना उच्च रक्तदाब तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खबरदारी म्हणून कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यात न्यूमोनियाची देखील लक्षणे दिसून आलेली होती. न्यूमोनियामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

वाचा: झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मानले महाराष्ट्राचे आभार

या घटनेसंदर्भात शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाकडून अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच रुग्णाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. त्यानंतर प्रशासनाकडून स्पष्ट माहिती देण्यात येणार आहे. मात्र, करोना संशयित रुग्णाच्या मृत्यूच्या बातमीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

वाचा: ही तर पंतप्रधान मोदींची बदनामी; शिवसेनेचा टोला

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज