अ‍ॅपशहर

जळगाव जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची नोंद; आकडा २७९ वर

जळगाव जिल्ह्यात काल रात्रीपासून १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा आता २७९ वर पोहोचला असून जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2020, 9:31 am
जळगाव: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातही करोनाचा प्रादूर्भाव दिवसागणिक वाढत आहे. काल रात्रीपासून तिथं १३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्याचा आकडा २७९ वर गेला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Coronavirus


करोना Live: राज्यातील रुग्णसंख्या ३३ हजार पार

जिल्ह्यातील भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील ४८ करोना संशयितांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. त्यातील ३५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १३ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भडगावचे १२ तर भुसावळ येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

दरम्यान, संपूर्ण राज्यातील करोना बाधितांची संख्या ३३ हजारांच्या पुढं गेली आहे. काल एका दिवसात राज्यात २३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात इतक्या संख्येनं रुग्ण मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर, आतापर्यंत ७,६८८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. सध्या राज्यभरात एकूण २४१६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज