अ‍ॅपशहर

जळगावात करोनाचा पहिला बळी; ६२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

महाराष्ट्रात करोनाचे बळी वाढत चालले असून जळगावातील करोनाबाधीत रुग्णाचा आज मृत्यू झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा हादरली आहे. जिल्ह्यातील हा करोनाचा पहिला बळी ठरला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2020, 5:27 pm
जळगाव: जिल्हा रुग्णालयात बुधवारी एक करोना संशयीत रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. या रुग्णाचा आज गुरुवारी दुपारी अडीच वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात करोनाचे दोन रुग्ण आढळून आलेले असून त्यातील एका रुग्णाचा आज मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus-test


करोनाचं निदान ५ मिनिटात शक्य; रॅपिड टेस्टला परवानगी


कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या जळगावातील एका ६३ वर्षीय वृद्धाचा आज दुपारी तीन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या वृद्धाचा कालच बुधवारी रात्री उशिरा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा वैद्यकीय अहवाल जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला होता.

मुख्यमंत्र्यांची 'ही' सूचना पंतप्रधानांनी स्वीकारली

करोनामुळे मृत्यू झालेली वृद्ध व्यक्ती जळगाव शहरातील सालारनगर भागातील रहिवासी होती. त्यांचा फळे विक्रीचा व्यवसाय होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. काल रात्री त्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर आज सकाळपासून या वृद्धाची प्रकृती अधिकच खालावली होती. अखेर दुपारी ३ वाजता वृद्धाचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेले शर्थीचे प्रयत्न अपयशी ठरले.

'...म्हणून लॉकडाऊन असूनही लोक घराबाहेर'

उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास

करोना पॉझिटिव्ह असलेल्या या वृद्धाला उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा देखील त्रास होता. अशातच करोनाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह तसेच संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारलेल्या विशेष कक्षात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.

चमत्कार! इटलीतील 'या' गावात करोना नाही

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज