अ‍ॅपशहर

‘भंग न पावणारे अभंग’ मैफलीत रसिक तल्लीन

नामाचा गजर गर्जे भीमा तीर... या अभंगाने सुरूवात झालेला ‘भंग न होणारे अभंग’ हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि रोटरी क्लब जळगावचे सर्व सदस्य त्यात तल्लीन झाले.

Maharashtra Times 23 Jul 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cultural program at jalgaon
‘भंग न पावणारे अभंग’ मैफलीत रसिक तल्लीन


नामाचा गजर गर्जे भीमा तीर... या अभंगाने सुरूवात झालेला ‘भंग न होणारे अभंग’ हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि रोटरी क्लब जळगावचे सर्व सदस्य त्यात तल्लीन झाले. निमित्त होते, संतश्रेष्ठ शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीचे ! रोटरी क्लब जळगावने गणपती नगरातील रोटरी हॉल मध्ये या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

कार्यक्रमाचे निरूपण व निवेदन प्रा.रेखा मुजूमदार यांनी केले. दिलीप चौधरी यांनी नामाचा गजर यासह इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे अभंग सादर केले. स्वाती डहाळे यांनी ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ व ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ तर दिव्या चौधरी हिने ‘अमृताहूनी गोड नाम तुझे देवा’ हा अभंग सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. समारोप कवी कुमुदाग्रज यांच्या ‘देवा हा संसार’ या अभंगाने झाला. तबल्यावर साथ संगत मिलींद देशमुख यांनी केली. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष डॉ.तुषार फिरके व मानद सचिव मुकेश महाजन यांची उपस्थिती होती. संकल्पना कार्यक्रम समिती प्रमुख अशोक जोशी यांची होती. आभार दीपिका चांदोरकर यांनी मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज