अ‍ॅपशहर

‘दक्षिण आधुनिक’ नाटक प्रथम

जळगावात झालेल्या ५६ राज्य नाट्यस्पर्धेत उत्कर्ष कलाविष्कार संस्था भुसावळचे ‘दक्षिण आधुनिक’ हे नाटक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. द्वितीय क्रमांक ललित कला महाविद्यालय जळगावचे ‘वृंदावन’ तर डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे ‘जोकर’ला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

Maharashtra Times 29 Nov 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dakshin adhunik got first prize in state drama competition in jalgaon
‘दक्षिण आधुनिक’ नाटक प्रथम

जळगावात झालेल्या ५६ राज्य नाट्यस्पर्धेत उत्कर्ष कलाविष्कार संस्था भुसावळचे ‘दक्षिण आधुनिक’ हे नाटक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. द्वितीय क्रमांक ललित कला महाविद्यालय जळगावचे ‘वृंदावन’ तर डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे ‘जोकर’ला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

वैयक्तिक पारितोषिकांमध्ये दिग्दर्शन प्रथम- अनिल कोष्टी (दक्षिण आधुनिक), द्वितीय - किरणकुमार अडकमोल (जोकर), सर्वोत्कृष्ट अभिनय रौप्यपदक - भूषण निकम (वृंदावन), नेहा खपली (झेंडूचे फूल) तर अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्र स्वाती पाटील (वृंदावन), रोहिणी पालवे (खाप), मंजिरी साने (केस नं.९९), नारायण माळी (झेंडूचं फुल), श्रीकांत कुळकर्णी (दक्षिण आधुनिक), किरणकुमार अडकमोल (द रिबेलियस फ्लॉवर) यांना मिळाले आहे.

प्रकाश योजना प्रथम - नीलिमा पाटील (द रिबेलियस फ्लॉवर), राज गुंगे (वृंदावन). नेपथ्य प्रथम - विजय सोनार (वृंदावन), द्वितीय - विरेंद्र पाटील (झेंडूचं फुल), रंगभूषा प्रथम - आरती गोळीवाले (जोकर), द्वितीय - योगेश जगन्नाथ (खाप) यांना मिळाले आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून चंद्रकांत बर्वे, रमेश कदम आणि तुळशीराम कदम यांनी काम पाहिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज