अ‍ॅपशहर

कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

शहरातील राजमालतीनगर परिसरातील मशिदीजवळील खोल्यांमध्ये कुजलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

Maharashtra Times 16 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम deadbody seen in rajmaltinagar
कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ


शहरातील राजमालतीनगर परिसरातील मशिदीजवळील खोल्यांमध्ये कुजलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

याबाबत माहिती अशी की, राजमालती नगरातील मश‌िदीच्या मालकीच्या खोल्या आहेत. या खोल्या मश‌िदीच्या व्यवस्थापनाकडून भाड्याने दिल्या जातात. यातील एका खोलीमध्ये गेंदालाल मिल परिसरात वेल्ड‌िंगचा व्यवसाय करणारा अरुण सोनारही बऱ्याच दिवसांपासून राहण्यासाठी आला होता. अरुण सोनार हे खोलीमध्ये एकटेच राहत होते.

शुक्रवारी सकाळी त्यांच्या खोलीमधून दुर्गंधी येत असल्यामुळे मश‌िदीच्या व्यवस्थापनातील मुनीर बिसमिल्ला पटेल यांनी तेथे जाऊन पाहिले. खोलीचा दरवाजा ठोठावला असता आतून प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांच्या मदतीने तो दरवाजा उघडला. यावेळी खोलीमध्ये अरुण सोनार यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मयत अरुण सोनारच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जळगाव शहर पोल‌िसांत मुनीर बिसमिल्ला पटेल यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोल‌िस कर्मचारी करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज