अ‍ॅपशहर

मनपा कामगाराचा उष्माघातामुळे मृत्यू

शहरातील पिंप्राळा हुडको मरिमाता मंदिर पसिरातील रहिवासी व महापालिकेतील आरोग्य विभागाचे सफाई कामगाराचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २०) घडली. सुपडू महावीर पवार (वय ५५) असे मृत कामगाराचे नाव आहे.

Maharashtra Times 23 May 2019, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम break

शहरातील पिंप्राळा हुडको मरिमाता मंदिर पसिरातील रहिवासी व महापालिकेतील आरोग्य विभागाचे सफाई कामगाराचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २०) घडली. सुपडू महावीर पवार (वय ५५) असे मृत कामगाराचे नाव आहे.

सोमवारी सुपडू पवार दुपारी १ वाजता कामाहून परतले. यानंतर दुपारी झोपले होते. सायंकाळी त्यांनी पत्नी मंगला यांना स्वयंपाक करण्यास सांगितले. त्यांच्या घरी मुली तसेच जावई आलेले होते. सर्व घरात गप्पा मारत असताना सुपडू पवार हे बाहेर खाटीवर बसले होते. स्वयंपाक तसेच जेवणाची वेळ झाल्याने मुलगा सिद्धार्थ सुपडू पवार यांना जेवणाबाबत बोलाविण्यास गेला. या वेळी त्यांनी मी थोड्या वेळाने जेवतो असे सांगितले. काही वेळाने कुटुंबीयांना पडण्याचा आवाज आला. सर्व बाहेर आल्यावर सुपडू पवार हे चक्कर येऊन खाटीवर पडल्याचे लक्षात आले. जावयांसह मुलींनी त्यांना तत्काळ पिंप्राळा येथील खासगी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पवार कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मंगळवारी (दि. २०) मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पवार यांच्या तीन मुलींपैकी दोन विवाहित तर दोन मुलगे शिक्षण घेत आहेत. शरीरातील पाणी कमी झाल्याने उष्माघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज