अ‍ॅपशहर

नोटाबंदी वर्षपूर्तीला विरोधकांकडून आंदोलन

गेल्या वर्षी दि. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. आज (दि. ८) या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

Maharashtra Times 7 Nov 2017, 10:59 pm
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demonetization completes one year opposition parties agitation today at jalgaon
नोटाबंदी वर्षपूर्तीला विरोधकांकडून आंदोलन


गेल्या वर्षी दि. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. आज (दि. ८) या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत निषेध करण्यासाठी आज दुपारी शहरातून महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नोटाबंदीचे वर्षश्राद्ध करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या या चुकीच्या निर्णयामुळे देशाची संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे देशातील सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी यांना खूप त्रास व हाल सोसावे लागले. तसेच त्यांचे अतोनात नुकसानही झाले असल्याचा आरोप काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे. या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज, दुपारी २:३० वाजता शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ. अर्जुन जी. भंगाळे, शहर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केले आहे.


राष्ट्रवादीकडून 'वर्षश्राद्ध'

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूचनेप्रमाणे जिल्हास्तरावर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, सकाळी १०:३० वाजता व सर्व तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देऊन 'वर्षश्राद्धाचा' प्रतिकात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज