अ‍ॅपशहर

फडणवीस केंद्रात जाणार असतील तर त्यांना शुभेच्छा: एकनाथ खडसे

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्र जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते केंद्रात जाणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. या गोष्टीचे मी स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2020, 12:34 pm
जळगाव: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्र जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते केंद्रात जाणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. या गोष्टीचे मी स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम khade


एकनाथ खडसे आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते खरंच केंद्रात जाणार असतील तर मी या गोष्टीचे स्वागत करेल. ते अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा केंद्राला तर फायदा होईलच शिवाय राज्यालाही केंद्राच्या अनेक योजना पदरी पाडून घेण्यास मदत होईल. आपला एखादा जवळचा नेता केंद्रात जात असेल तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो, असे खडसे यावेळी म्हणाले.

वाचा:माझं राजकारण संपवण्याचा फडणवीस-महाजनांचा डाव: खडसे

फडणवीस सरकारच्या काळात माझे फोन टॅप झाल्याची बातमी मी वृत्तपत्रांतून वाचली. वृत्तपत्राच्या बातमीवर माझा विश्वास नाही. परंतु, जर खरंच माझे फोन टॅप झाले असतील तर ही बाब दुर्दैवी आहे. माझेच नाही तर अन्य कोणाचेही फोन टॅपिंग होणं समर्थनीय नाही, अशी प्रतिक्रिया खडसेंनी यावेळी फोन टॅपिंग प्रकरणासंदर्भात दिली. राज्य सरकारने आता फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत सत्य बाहेर येईलच. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, असे खडसे यावेळी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज