अ‍ॅपशहर

काँग्रेस-राष्ट्रवादीला डाव्यांचा पाठिंबा

धुळे महानगरपालिका निवडणूकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला डाव्या आघाडीने पाठिंबा दिला असून, राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Maharashtra Times 29 Nov 2018, 5:00 am
माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dhule municipal corporation election news
काँग्रेस-राष्ट्रवादीला डाव्यांचा पाठिंबा


म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महानगरपालिका निवडणूकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला डाव्या आघाडीने पाठिंबा दिला असून, राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, डाव्या आघाडीचे नेते उपस्थित होते. भाजप मनुवादी पक्ष असून, आमची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे डाव्या आघाडीचे नेते कॉ. पोपट चौधरी, कॉ. एल. आर. राव यांनी स्पष्ट केले. या वेळी कदमबांडे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, गेल्या पाच वर्षांत अनेक विकासकामे मनपाच्या माध्यमातून केली. मनपाची सलग तीनवेळा सत्ता राष्ट्रवादी-काँग्रेसकडे राहिली. परंतु, आता भाजपचा अजेंडा काय, त्यांनी तर ५५ उमेदवार आयात केले आहेत. आम्हाला जे सोडून गेले ते आमचे कार्यकर्ते होते. पण ते चांगले की वाईट हे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी ठरवावे, असे कदमबांडे यांनी सांगितले. भाजप आणि आमदार अनिल गोटे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनी धुळे शहराला विकासापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप कदमबांडे यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज