अ‍ॅपशहर

राजवाडे संशोधन मंडळाला पुरुषोत्तम पुरस्कार

इतिहास संशोधनाचे उत्कृष्ट कार्य करणारी इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे संशोधन मंडळाला पुरुषोत्तम पुरस्कार हा उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे.

Maharashtra Times 31 Aug 2017, 4:00 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dhules rajwade research mandal got puroshottam award
राजवाडे संशोधन मंडळाला पुरुषोत्तम पुरस्कार

राजवाडे मंडळाला पुरस्कार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

इतिहास संशोधनाचे उत्कृष्ट कार्य करणारी इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे संशोधन मंडळाला पुरुषोत्तम पुरस्कार हा उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. सहकारमहर्षी पी. के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि. ९ ऑक्टोबरला राजवाडे मंडळास पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र असे आहे. याबाबतची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी बुधवारी (दि. ३०) पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील राजवाडे संशोधन मंडळ यंदा पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित होणार असल्याने मंडळाच्यावतीने पत्रकार परिषदेत माहिती देतांना अध्यक्ष मदनलाल मिश्रा, क्युरेटर श्रीपाद नांदेडकर, ग्रंथपाल नंदलाल अग्रवाल, डॉ. लता अग्रवाल, जयश्री शहा व मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी, महाराष्ट्रातील शिक्षण संशोधन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्रातील मोजक्या कार्यक्षेत्रातील संस्थांना यापूर्वीही हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे राजवाडे संशोधन मंडळाच्या कार्याची नोंद घेतली आहे. त्यासोबत येत्या काळात संस्थेचे कार्य वृद्धिंगत करणे याबाबत सजग करणारादेखील आहे, असे मुंदडांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज