अ‍ॅपशहर

दीक्षितवाडी भूखंड वर्षभर संस्थेच्या ताब्यात

दीक्षित वाडीतील भूखंडाबाबत झालेल्या चर्चेत सोमवारी (दि. २४)‌ विशेष महासभेत नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक आणि मतभेद उमटून आले. या विशेष महासभेत दीक्षित वाडीतील भूखंड क्र. १६० मधील ८८७.१० चौरस मीटर खुली जागा ९९ वर्षांच्या करारावर १९८४ मध्ये महाराष्ट्र महिला उद्यम ट्रस्ट संस्थेला दिली होती.

Maharashtra Times 25 Jul 2017, 4:00 am
जळगाव : दीक्षित वाडीतील भूखंडाबाबत झालेल्या चर्चेत सोमवारी (दि. २४)‌ विशेष महासभेत नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक आणि मतभेद उमटून आले. या विशेष महासभेत दीक्षित वाडीतील भूखंड क्र. १६० मधील ८८७.१० चौरस मीटर खुली जागा ९९ वर्षांच्या करारावर १९८४ मध्ये महाराष्ट्र महिला उद्यम ट्रस्ट संस्थेला दिली होती. ती जागा अद्यापपर्यंत विकसित न केल्यामुळे मनपाने जागा ताब्यात घेतली. त्यामुळे संस्थेने दिलेल्या पत्रावरून कलम ९१ ची कार्यवाही करण्यासाठी वर्षभर जागा ताब्यात राहू द्यावी, तसेच मनपाने संस्थेला दिलेल्या पत्राला स्थगिती द्यावी, असा ठराव महासभेत ठेवण्यात आला. मात्र या ठरावाला भाजप नगरसेवकांसह नरेंद्र पाटील, राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी विरोध केला. त्यामुळे ही जागा वर्षभर संस्थेच्या ताब्यात जागा राहू देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादीतील अश्विनी देशमुख वगळता सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे मतभेद पुन्हा एकदा दिसून आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम diskhitvadi place issue at muncipal corporation jalgaon
दीक्षितवाडी भूखंड वर्षभर संस्थेच्या ताब्यात


नगरसेवकांत तू तू- मै मै

महासभेत नगरसेवक अनंत जोशी यांनी दीक्षित वाडीतील खुल्या जागेबाबत चर्चा सुरू असताना आपण वर्षभरासाठी का स्थगिती देतो? असे सांगत शहरातील खुल्या जागांबाबतचा मुद्दा उपस्थित केला. यावर माजी महापौर रमेश जैन यांनी अन्य खुल्या जागेचा आता हा विषय नसून, या विषयावर ज्याला विरोध करायचे असेल त्यांनी विरोध नोंदवावा, असे सांगितले.

यावरून रमेश जैन आणि बंटी जोशी यांच्यात चांगलीच तु तु - मै मै रंगली होती. चर्चा सुरु असतांनाच भाजपचे नगरसेवक सुनिल माळी यांनी जागेबाबत गोलमाल असल्याचे निदर्शनास आणून दिले. वाद टोकाला जात असतानाच महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे यांनी मध्यस्थी नियमानुसारच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज