अ‍ॅपशहर

पुन्हा बडतर्फीचे आदेश!

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात दर बुधवारी भरणाऱ्या बाजारात फी पावत्यांच्या गैरव्यवहार होत असल्याचा संशय नगरासेवक अमर जैन यांनी व्यक्त केला. याप्रकरणी चौकशी करुन संबंधितांना तत्काळ बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी स्थायी सभेत दिलेत.

Maharashtra Times 18 Nov 2017, 4:42 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dismiss order in jalgaon corporation
पुन्हा बडतर्फीचे आदेश!


जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात दर बुधवारी भरणाऱ्या बाजारात फी पावत्यांच्या गैरव्यवहार होत असल्याचा संशय नगरासेवक अमर जैन यांनी व्यक्त केला. याप्रकरणी चौकशी करुन संबंधितांना तत्काळ बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी स्थायी सभेत दिलेत. तसेच स्थायी सभेत उपस्थित केलेल्या प्रलंबित प्रश्‍नांना तत्काळ सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात.

स्थायी समितीची सभा दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात झाली. सभापती ज्योती इंगळे, अप्पर आयुक्त राजेश कानडे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, शहर अभियंता डी. बी. दाभाडे, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. पिंप्राळ्यातील बुधवारच्या आठवडेबाजारात वसुली पावत्यांचा घोळ होत असल्याचे नगरसेवक अमर जैन यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या पावत्यांच्या घोळाची चौकशी करण्याची मागणी जैन स्थायी सभेत केली. प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी वसुली पावत्यांचा घोळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका तासाच्या आत बडतर्फ करावे, असे आदेश सभागृहात काढले. अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. त्यात बंडु म्हस्के, दा. ग. मोरे यांचे अपिल मान्य करण्यात आले. बालवाडीमधील शिक्षिकांना मानधनावर नियुक्तीच्या विषय मंजूर करण्यात आला.

बांधकाम विभागाची तक्रार

नगरसेवक नितीन बरडे यांनी प्रशासकीय मान्यता मिळूनही बांधकाम विभागात काम होत नसल्याची तक्रार केली. तेथे कर्मचारी नसल्याने कामकाज होत नसल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. माहिती मागितली असता टोनर-कागद नसणे असे कारण पुढे करण्यात येत असल्याचे सांगितले.

कठडा दुरुस्त करा

नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी शिवाजी नगर येथील पुलाचा कठडा तुटला असल्याची तक्रार केली. यावर बांधकाम विभागाला तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. पुलाचे काम भविष्यांत होणार असले तरी तात्पुरती दुरूस्तीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या वार्डांत झाडू नसल्याने साफसफाई केली जात नसल्याचेही सभागृहाच्या लक्षात आणून दिले. आरोग्य अधिकारी उदय पाटील यांना आयुक्तांनी घमेली, फावडे, झाडू खरेदी करण्याचे आदेश दिले. तसेच याबाबत संध्याकाळपर्यंत खरेदीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज