अ‍ॅपशहर

‘जिल्हा प्रशासन महापालिकेसोबत’

जळगाव शहराच्या विकासासाठी महापालिकेला नेहमीच जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी शनिवारी (दि. १८) महापालिकेत भेटीप्रसंगी दिले. महापालिकेला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दुपारी अडीच वाजता सदिच्छा भेट दिली.

Maharashtra Times 18 Mar 2017, 10:43 pm
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम district admin and muncipal corporation works together for jalgaon city development
‘जिल्हा प्रशासन महापालिकेसोबत’

जळगाव शहराच्या विकासासाठी महापालिकेला नेहमीच जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी शनिवारी (दि. १८) महापालिकेत भेटीप्रसंगी दिले. महापालिकेला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दुपारी अडीच वाजता सदिच्छा भेट दिली.

आयुक्त सोनवणे यांच्या दालनात मनपा प्रशासनाचे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामांबाबत माहिती घेऊन सूचना दिल्या. मनपा प्रशासनाच्या सोबत जिल्हा प्रशासन सदैव सोबत राहील असे आश्वासन यावेळी दिले. महापौर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महापौर लढ्ढा यांनी सरकारकडून मंजूर असलेला मासळी मार्केट प्रकल्प जागा मिळण्यास येत असलेल्या अडचणीमुळे रेंगाळलेला आहे. निवडण्यात आलेली ट्रॅफिक गार्डनची जागा मनपासाठी आरक्षित असली तरी ती नावावर झाली नसल्याने जागा मिळण्यास अडचणी येत आहे. ही समस्या सोडवावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना महापौरांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज