अ‍ॅपशहर

गोदावरी अभियांत्रिकीत ‘बाटू’च्या उपकेंद्रास प्रारंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अर्थात ‘बाटू’ विद्यापीठाचे उपकेंद्र गोदावरी अभियांत्रिकी येथे निश्चित करण्यात आले असून, या उपकेंद्राचा प्रारंभ आज (दि. २०) सकाळी १० वाजता कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांच्या हस्ते होणार आहे.

Maharashtra Times 20 Jun 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dr babasaheb ambedkar technical university subcenter at godavari college jalgaon
गोदावरी अभियांत्रिकीत ‘बाटू’च्या उपकेंद्रास प्रारंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अर्थात ‘बाटू’ विद्यापीठाचे उपकेंद्र गोदावरी अभियांत्रिकी येथे निश्चित करण्यात आले असून, या उपकेंद्राचा प्रारंभ आज (दि. २०) सकाळी १० वाजता कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांच्या हस्ते होणार आहे.

बाटू विद्यापीठाशी खान्देशातील सात अभियांत्रिकी महाविद्यालय संलग्न झाले आहेत. यापैकी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येते ‘बाटू’ विद्यापीठाचे उपकेंद्र ठरवण्यात आले आहे. या उपकेंद्राचा शुभारंभ आज होणार आहे. या कार्यक्रमाला नाशिक डीटीईचे सहसंचालक प्रा. डी. पी. नाथे, बाटूचे रजिस्ट्रार डॉ. एस. एस. भामरे, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. जी. अराजपुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थी व पालकांसाठी चर्चासत्र

‘बाटू’ विद्यापीठांतर्गत बी. टेक. अभियांत्रिकीला नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज (दि. २०) दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच विद्यार्थी व पालकांसाठी खुले चर्चासत्र ठेवण्यात आले असून, प्रवेशासह इतर विषयांबाबत शंका निरसनही केले जाणार आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन कॉलेजमार्फत करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज