अ‍ॅपशहर

पाणीपुरवठा योजनेनंतरच भुयारी गटारींची मंजुरी

महापालिकेची सध्याच्या पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्था जीर्ण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करताना गळत्यांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे प्रति माणसी दररोज १३५ लिटर पाणी देणे अवघड असल्याने आता भुयारी गटारींची योजना महापालिकेला घेता येणार आहे. अमृतच्या माध्यमातून वितरण व्यवस्था सक्षम झाल्यानंतरच भुयारी गटारींची योजना सरकारकडून मंजूर केली जाऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Maharashtra Times 16 Feb 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drainage schemes apply after water supply scheme in city
पाणीपुरवठा योजनेनंतरच भुयारी गटारींची मंजुरी

महापालिकेची सध्याच्या पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्था जीर्ण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करताना गळत्यांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे प्रति माणसी दररोज १३५ लिटर पाणी देणे अवघड असल्याने आता भुयारी गटारींची योजना महापालिकेला घेता येणार आहे. अमृतच्या माध्यमातून वितरण व्यवस्था सक्षम झाल्यानंतरच भुयारी गटारींची योजना सरकारकडून मंजूर केली जाऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

महापालिकेचा अमृत योजनेत समावेशातून पाणीपुरवठा योजनेस मंजूरी मिळाली आहे. यात जलवाहिन्यांची नवीन वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील १९१ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही योजना एकाच राबविण्याबाबत पदाधिकारी आग्रही आहेत. भुयारी गटारी योजनेसाठी प्रतिमाणसी १३५ लिटर पाणीपुरठा करणे आवश्यक असते. जळगावात पाणी मुबलक असले तरी ही पाणीपुरवठा वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. त्यामुळे त्यात सुमारे ७२ टक्के लॉसेस आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज