अ‍ॅपशहर

विसर्जनादरम्यान जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू

गणपती विसर्जनासाठी मन्यारखेडा येथे गेलेल्या सुप्रीम कॉलनीतील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. यासह वेगवेगळ्या घटनांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात चौघांचा श्री विसर्जनादरम्यान बुडून मृत्यू झाला.

Maharashtra Times 25 Sep 2018, 5:00 am
मन्यारखेडा गावाजवळील तलावात तरुण बुडाला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम during the lord ganesha immersion four youth die in the jalgaon district
विसर्जनादरम्यान जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

गणपती विसर्जनासाठी मन्यारखेडा येथे गेलेल्या सुप्रीम कॉलनीतील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. यासह वेगवेगळ्या घटनांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात चौघांचा श्री विसर्जनादरम्यान बुडून मृत्यू झाला.

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील अविनाश ईश्वर कोळी (वय २०) श्री साई मित्र मंडळाचा सदस्य होता. रविवारी दुपारी मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास मिरवणूक मन्यारखेडा येथील तलावावर पोहचली होती. मंडळाचे विसर्जन सुरू असताना अविनाश याचा पाय घसरल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. काही तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अविनाशला वाचवू शकले नाही. अखेर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती काठावरच सोडून देत अविनाशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानतंर त्यास मृत घोषीत केले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

चोपडा तालुक्यातील कोळी कुटंबीय कामाच्या निमित्ताने काही वर्षांपासून सुप्रीम कॉलनीत स्थायिक झाले आहेत. अविनाश याच्या वडीलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. आई कंपनीत काम करून अविनाश व त्याच्या लहान बहिणीचा उदरनिर्वाह करीत आहे. अविनाश हा घरातील एकुलता मुलगा होता. तो सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूमुळे आई व बहिणीवर दु:खाचा डोंगर कोसळला. अविनाशचाी आई व बहिण यांनी सायंकाळी रुग्णालयात धाव घेतली. एकुलत्या मुलाचा मृतदेह पाहून त्याच्या आईने हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. त्यांचा आक्रोश पाहुन तेथे उपस्थित असलेल्या अनेकांचे डोळे पाणावले होते.

जिल्ह्यात इतरत्र तिघांचा बडून मृत्यू
भुसावळ तालुक्यात तापी नदीत बुडून नितीन ऊखा मराठे (वय ३२, रा. ऑर्डनन्स फॅक्टरी) याचा मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील पळासखेडे बुद्रूक येथे गणपती विसर्जन करताना मनीष वामन दलाल (रा. जामनेर) या युवकांचा नदीत बूडून मृत्यू झाला. तसेच भडगाव येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या प्रफुल्ल रमेश पाटील (रा. वलवाडी ता. भडगाव) या विद्यार्थ्यांचा विसर्जनादरम्यान पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज