अ‍ॅपशहर

हावडा एक्स्प्रेसमधून १८ किलो गांजा जप्त

हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून आलेला १८ किलोचा गांजा लोहमार्ग पोलिसांनी रविवारी (दि. ८) रात्री जळगाव स्थानकावर जप्त केला. याची बाजारातील किंमत एक लाख ८७ हजार ८२० रुपये असून, याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुजरात राज्यात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे.

Maharashtra Times 9 Jan 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eighteen kilogram of ganja seized from howrah express
हावडा एक्स्प्रेसमधून १८ किलो गांजा जप्त


हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून आलेला १८ किलोचा गांजा लोहमार्ग पोलिसांनी रविवारी (दि. ८) रात्री जळगाव स्थानकावर जप्त केला. याची बाजारातील किंमत एक लाख ८७ हजार ८२० रुपये असून, याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुजरात राज्यात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे.

हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या एस ७ बर्थ क्र. ३२ च्या खालून गुजरात राज्यात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती एका प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांच्या नागपूर कंट्रोल रूमला दिली होती. या माहितीच्या आधारे भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी ७ जानेवारीला रात्री ९ वाजता गाडी फलाट क्र. ३ वर दाखल होताच लोहमार्ग पोलिस डब्याची तपासणी सुरू होती. यावेळी आरोपी पंचान्न सोईन चिंतामणी सोईन (वय २४, रा. बालागड जि. गंजाम, ओडिशा) हा पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच सीट खाली ठेवलेला पावणे दोन लाखांचा १८ किलो ७८२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिलीप गढरी, पीएसआय प्रवीण शिंदे, हेड कॉन्स्टेबल न्हावकार, पोलिस नाईक राजेश पाटील, जय कोळी, शैलेश पाटील, विजय शेगावकर, विलास जाधव, महिला कॉन्स्टेबल अलका अढाळे, भरत शिरसाठ, विकास पाटील, नितीन पाटील, सुनील पाटील यांच्या पथकाने केली.

उमाळ्यात शेतातून कापसाची चोरी

जळगाव : तालुक्यातील उमाळा शिवारातील शेताच्या गोदामात असलेला २० क्विंटल कापूस अज्ञात चोरट्याने लांबवून नेल्याची घटना सोमवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमाळा शिवारात प्रवीण एकनाथ पाटील यांचे शेत आहे. समाधान बळीराम धनगर यांनी प्रवीण पाटील यांच्या शेतात कापसाचे उत्पादन घेतले होते. गेल्या दोन महिन्यांपासून शेतातील कापूस हा शेतात असलेल्या गोदामात होता. रविवारी, समाधान धनगर हे सायंकाळी ७ वाजेपर्यंत शेतात होते. सोमवारी, सकाळी ते ७.३० वाजेच्या सुमारास शेतात आले असता, त्यांना गोदामाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत शिरून पाहिले असता, गोदामामधील जवळपास २० क्विंटल कापूस अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज